Lootcase | लुटकेस | Movie Review

Lootcase | लुटकेस
Lootcase | लुटकेस | Movie Review
Lootcase

बरेच दिवस झाले चांगला विनोदी चित्रपट आपन पाहिलेला नाही ?मग हा चित्रपट ठरू शकतो तुमच्या विरंगुळ्यासाठीउत्तमपर्याय एकदा नक्की पहा… जर रिकामी राहून अस्वस्थेतून आलेलली व्यस्तता तुमचं मन रमू देत नसेल तर लुटकेस चित्रपट पहा जेणे करून विरंगुळाही होईल आणि उगाचचं आलेली अस्वस्थता आणि व्यस्तता दोन्हीही निघून जातील.

अगदी काही दिवसांपूर्वी “लुटकेस🤩🤩 हा चित्रपट Hotstar Diseny या O.T.T. Platform वर रिलीज झाला तसे कुणाल खेमू चे चित्रपटप्रेक्षकांकडून जरा कमीच पाहिले जातात पण लुटकेसहा त्याचा लीड रोल असलेला चित्रपट या बाबतीत अपवादचं. प्रेक्षकांनि कुणाल खेमूला आतापर्यंत दिलेली नापसंती पाहता एकंदरीत पोस्टर पाहून हा चित्रपट पण त्यात आणखी एक भर अस वाटत असताना मात्र या चित्रपटाला प्रेक्षकांनि उस्फुर्त प्रतिसाद दिलाय यातच आले अभिनेता म्हणून कुणाल खेमूला चे आणि चित्रपटाचे यश. चित्रपटाच्या अगदी पहिल्या फ्रेम पासून ते शेवटच्या फ्रेम पर्यंत मनसोक्त आणि मनमुराद आनंद लुटावा असा हा चित्रपट. (मधलं नकोस वाटणार एकमात्र गाण सोडलं तर) चित्रपट संपवल्यानंतर प्रेक्षकांच्या तोंडून चित्रपटासाठी जर काही निघ असेल तर ती फक्त स्तुतीसुमनं. आणि चित्रपटाचे विलक्षण विनोदी संवाद. हल्ली या चित्रपटाचे संवाद सोशल मिडीयावर मिम्स स्वरुपात खूप गाजतायत.

हा चित्रपट ब्लेक कॉमेडी या प्रकरात मोडतो. “लुटकेसचित्रपट चार प्रमुख आधारस्तंभावर उभा राहिलाय (अस मला वाटतं) आणि ती म्हणजे चित्रपटाचं कथानक (पटकथा), उत्तम संवाद, चित्रपटातील उत्तम कास्टिंग आणि साहजिकच कलाकारंचा सर्वोत्तम अभिनय. त्याच बरोबर दिग्दर्शन ही उत्तमच. कथानकाला साजेशी भूमिका करतना सर्वच कलाकार दिसतात एका पेक्षा एक वरचढ अभिनय पाहायला मिळतो. कास्टिंग इतकं भन्नाट केलंय की सर्वच अभिनयातील दर्जा कलावंतांची मांदियाळी तुम्हाला या चित्रपटात पहायला मिळेल. सगळ्यांनीच कथानकाला आपल्या अभिनयातून पुरेपूर न्याय दिलाय आणि विनोदी प्रसंगांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यात सगळेच कलाकार यशस्वी होताना दिसतात. चित्रपटातील प्रयेक पात्र ज्या पद्धतीने लिहिलं गेलंय त्यामुळे प्रत्येक पात्र आपला ठसा उमटवण्यात यशस्वी झालाय अस आपण म्हनु शकतो. विशेष म्हणजे नायक म्हणून आपल्या पहिल्या चित्रपटात नावारुपाला आलेला आणि त्यानंतर गोलमाल सोडला तर सगळीकडेच दुर्लक्षित झालेला कुणाल खेमू या चित्रपटात सगळ्याच कसलेल्या कलाकारांना अभिनयाच्या बाबतीत तोडीची स्पर्धा देताना दिसतो.


चित्रपट पूर्णपणे मनोरंजन हेतू बनवला गेला आहे आणि यात कुठल्याही प्रकारचा सामाजिक संदेश देण्याचा बळजबरीचा प्रयत्नही तुम्हाला दिसणार नाही सहज, सरळ डोकं बाजूला ठेवून मनसोक्त आनंद घ्यावा असा हा चित्रपट अस म्हटलं तर अजिबात वावगं ठरणार नाही. चित्रपटातील एकही पात्र तुम्हाला कंटाळवाण किंवा रटाळ वाटणार नाही. चित्रपटातील संवाद आणि त्याची संवादांची रचना एकदम सर्रस. संवाद लिहिणार्यास २१ तोफांची सलामीच. संवाद ऐकताना कुठतरी मनात वाटून जाईल “कस्स सुचतं कस्स”


काही खास कलाकार आणि त्यांच्या अभिनयाला न्याय देणार चित्रीकरण संवाद आणि कथानक इतकंच म्हणू शकतो मग तो विजय राज❤️ ने साकारलेला बाला भाई असो वा निलेश दिवेकर याने साकारलेला “राजन” असो वा आकाश दाभाडे ने साकारलेला “ग्रेजूएट” असो वा  गजराज राव❤️ यांचा एम. एल. ए पाटील वा अतुल तोडणकर🤩 हा पाटीलचा पी. ए. असो वा इन्स्पेक्टर कोल्ते च्या भूमिकेतला रणवीर शोरी❤️ वा कुणाल खेमूच्या बॉस च्या भूमिकेतले विजय निकम असो वा बालू या नोकराच्या भूमिकेतला सदा यादव वा “लता” म्हणजेच कुणाल खेमूच्या पत्नी च्या भूमिकेत असलेली रसिका दुग्गल👌 एकदम सहज आणि उत्तमरित्या आपली भूमिका वटवताना दिसते. पती नंदन कुमार पत्नी लता यांचा चिमुकला सुपुत्राच्या भूमिकेत असलेला आर्यन प्रजापती त्यांच्या जोडीला चार चांद लावताना दिसतो. आणि मुक्ख्य भूमिकेतला कुणाल खेमू👌म्हणजेच नंदन कुमार सगळेच मनाला भावतात. “अंदाज अपना अपना❤️ नंतर विनोदाच्या बाबतीत निखळ आणि निरागस असा हा चित्रपट ज्याला कुठल्याही अंगाविक्षेपी विनोदाची किंवा Below the Belt विनोदाची गरज भासली नाही. वर्ष २०२० मध्ये सुद्धा असे निरागस विनोद असलेले चित्रपट जन्माला येवू शकतात त्याचं “लूटकेस” हा चित्रपट उत्तम उदाहरण यातले विनोद देखील २०२० मधले आहेत हे मात्र नक्की. भन्नाट विनोदी चित्रपट🥳 भयंकर विनोदी चित्रपट, एकदा नक्की पहा…

Lootcase | लुटकेस | Movie Review
तुम्हाला आमचा ब्लॉग सिनेमासमीक्षक आवडला असल्यास ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून व तुमचे मत दर्शवा…
(सबस्क्राईब केल्यानंतर, आपल्या ईमेल आयडीवर जाऊन वेरीफाय करण्यास विसरू नका)
ट्रेलर पहा …
 
 
 Video Source : FoxStarHindi YouTube Official Channel


Lootcase | Official Trailer | Kunal | Gajraj | Vijay | Dir: Rajesh Krishnan

Ratings : 9.2/10

Lootcase | लुटकेस | Movie Review
Cinema Samikshak

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *