डार्क नाईट मधला जोकर, बैटमैन पेक्षाही जास्त मनाला का भिडतो? भाग २

डार्क नाईट मधला जोकर🤡, बैटमैन पेक्षाही जास्त मनाला का भिडतो?

#भाग१ पासून Continuation करत पुढे…

#भाग२

क्रिस्टोफर नोलन❤️ यांच्यासाठीचं…🎬

नमस्कार मित्रहो 🙏 भाग १ मध्ये आपण Discuss केलं होता “जोकरबैटमैनवर कशा पद्धतीने आपलं वर्चस्व गाजवतो तिथून पुढे सरकत आज आपण चर्चा करणार आहोत… “क्रिस्टोफर नोलन” ने तंतोतंत पाळलेल्या स्क्रीन रायटिंग च्या दुसर्या नियमाची, नियम : एखाद्या माणसाचे खरे चरित्र ती व्यक्ती दबावाखाली असताना घेतलेल्या निर्णयांवरून किंवा निवडीवरून खुलून येते, जेवढा जास्त दबाव तेवढ्याच तीव्रतेने ते त्या चरित्राचा साक्षात्कार होतो. माणसाच्या खर्या चरित्रावरून त्याची निवड ठरते.” (हे मराठीत जमेल तस केलेलं भाषांतर आहे ईतकच) या नियमाचा उल्लेख देखील आपण “रोबर्ट मकी” यांच्या स्क्रीन रायटिंग वर आधारित “स्टोरी” या पुस्तकात पाहू शकता. पटकथेत नोलान ने केलेलं नियमांचं पालन कथानकाची शिस्तबद्ध पद्धतीने बांधणी करते त्याचबरोबर दर्शकांना शेवटपर्यंत बांधून ठेवण्यात सक्षम ठरते.

जोकर पडद्यावर पाहताना दर्शकांनी जोकर आप आपल्या पद्धतीने रंगवला यातच नोलान च श्रेय आलं आणि संपूर्ण मेहनत सार्थक ठरली. पण नोलान चा जोकर खरचं तुम्हा आम्हाला कळला तसा होता का कि यामागेही नोलान चा वेगळा दृष्टीकोन होता… आपल्या सर्वांना कळलेला जोकर तसा आपआपल्या परीने योग्यच… ही बाब अजिबात नाकारता येणार नाही तरीही नोलान जोकर ला कसा पाहतो? नोलान ने जोकर च्या रुपात जगाला खरचं विलन दिलाय का? असे प्रश्न जेव्हा पडतात तेव्हा क्रिस्टोफर नोलनचा “जोकर” आपल्या समजाच्या पलीकडे जाऊन समजावा लागतो. सहसा विलन म्हटलं Good v/s Bad च्या चर्चा रंगतातच आणि रंग्ल्याही पाहिजेत… पण जोकर कसा नेमका विलन नसून ती एक प्रवृत्ती आहे आणि त्या पलीकडे जाऊन तो तुम्हा आम्हाच्या कधी नं डोक्यात आलेला एक विचार तर नाही ना असाही प्रश्न नोलान आपल्या समोर उपस्थित करतो.

Advertisment

हे सगळ पडद्यावर घडतं ते स्क्रीन रायटिंग मध्ये वापरल्या गेलेल्या दुसर्या नियमामुळे कथानका प्रमाणे जोकर बैटमैनवर इतका दबाव निर्माण करतो कि पावलो पावली त्याला चांगलं आणि वाईट यात निवड करायला भाग पाडतो आणि ती निवड इतकी पेचात टाकणारी असते की बैटमैन संभ्रमात पडतो त्याच्यासाठी त्या निवडी त्याच्या चरित्रावर शिंतोडे उडवनार्या असतात. सतत चा इतका प्रचंड दबावाखाली, बैटमैनने घेतलेल्या निर्णयामुळे कधीतरी बैटमैनचं खर रूप जगाला कळेल या प्रतीक्षेत जोकर असतो. जेव्हा जोकर ला कळून चुकत इतक्या सहजा सहजी बैटमैन खचणार नाही तेव्हा तो अशी एक परीस्थिती निर्माण करतो ज्यातून बैटमैन सहजा सहजी सुटूच शकणार नाही आणि ती परिस्थिती म्हणजे बैटमैनचं पहिलं प्रेम “रेचल” आणि “हार्वी डेंट” दोघांपैकी एकाला वाचवण्याची संधी आणि ही Choice इतकी कठीण असते की एक क्षण बैटमैनला काय करावे हे सुचत नाही… पण शेवटी तो तेच करतो जे नैतिकतेवर बेतलेलं असतं. आपल्या प्रेमात आणि हार्वी डेंट सारख्या सज्जन व्यक्ती ज्याने एक वेळेस बैटमैनला जोकर च्या चक्रव्यूहातून बाहेर काढले होते त्याच बरोबर जो आता रेचल चा प्रेमी देखील आहे या दोघान मध्ये कुणाचा जीव वाचवावा हि निवड चुकली तर बैटमैनच्या चरित्रावर आणि त्याच्या अस्तिवावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. आपल्या प्रेमाचा भावनिक दृष्ट्या क्षणभरही विचार न करता बैटमैन, हार्वी डेंट ला वाचवतो. या सर्व परस्थितीत जोकर जरी सरस ठरला असला तरी बैटमैन आपलं अस्तित्व हरवू देत नाही अस वाटतं असताना जोकर ने हॉस्पिटल मध्ये जाऊन आगीत भाजलेल्या आणि चेहरा विक्षत्प्त झालेल्या जो आपली प्रेयसी रेचलला गमावून बसला होता अशा हार्वी डेंट ला भेट देतो आणि नवी परिस्थिती निर्माण करून दबाव कायम ठेवण्यात यशस्वी होतो. तेव्हा परिस्थिती ला सांभाळून घेण्यासाठी बैटमैन ला स्वतःवर सर्व आरोप घेऊन अंधारात अदृश्य व्हावं लागतं आणि अश्या प्रकारे उजेडाच परिवर्तन अंधारात होतं आणि डार्क नाईट नावाची किमया घडते.

चित्रपटाचा End अनपेक्षित असला कि सिनेमा उत्कृष्ट असतो हा समज चुकीचाच, इथे नोलान अनपेक्षित End चा विचार नं करता नवीन प्रश्न उपस्थित करताना दिसतो. नक्की कोण जिंकल? तो… जो प्रत्येक व्यक्तीच्या आतला राक्षस बाहेर काढून जगासमोर आणतोय तो जोकर की अंधारात अदृश्य झालेला बैटमैन? नोलान चा जोकर फक्त विलन नसून तुमच्या आमच्यात दडलेली एक राक्षशी प्रवृत्ती आहे जी फक्त आणि फक्त आपण प्रचंड दबावाखाली असल्यावर बाहेर येते.

यावेळी बैटमैन अथवा जोकर पेक्षा कोणी सरस💪 ठरत असेल तर तो सिनेमाचा दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन❤️ अजून बरच काही आहे लिहिण्यासारखं पण इथेच थांबुया, काही आवर्जून नमूद करायच्या गोष्टी राहून गेल्या आहेत म्हणून भाग ३ पण घेऊन येवू वाचायला आवडणार असल्यास कृपया कमेंट करून सांगा नक्की प्रयत्न करु…
 
 
डार्क नाईट मधला जोकर🤡, बैटमैन पेक्षाही जास्त मनाला का भिडतो?
Batman Dark night Joker’s Character Explained in Marathi
Dedciated to Christopher Nolan


भाग २ आवडल्यास आणि भाग ३ वाचायची उत्सुकता असल्यास कृपया कमेंट करून सांगा…

तुम्हाला आमचा ब्लॉग सिनेमासमीक्षक आवडला असल्यास ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून व तुमचे मत दर्शवा…
  (
सबस्क्राईब केल्यानंतर, आपल्या ईमेल आयडीवर जाऊन वेरीफाय करण्यास विसरू नका)

Joker’s Pencil Trick – The Dark Knight [4K Ultra HD]

 Batman Dark night Joker’s Character Explained in Marathi


Cinema Samikshak

www.cinemasamikshak.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *