डार्क नाईट मधला जोकर🤡, बैटमैन पेक्षाही जास्त मनाला का भिडतो?
#भाग२ पासून Continuation करत पुढे…
#भाग3
क्रिस्टोफर नोलन❤️ यांच्यासाठीचं…🎬
नमस्कार लिखाण सुरु करण्याआधी एक छोटीशी गोष्ट नमूद करू इच्छितो हे विश्लेषण म्हणा किंवा लेख म्हणा किंवा नुसतच लिखाण… प्रत्येक जन आप आपल्या पद्धीतेन यावर प्रतिकिया देऊ शकतो आणि आम्हाला आवडेल ही. हे जे काही आम्ही लिहितोय हे आम्ही आमच्या पद्धतीने केलेल्या अध्यायनातून आणि आमच्या दृष्टीकोनातून मांडतोय काही चुकीच वाटल्यास सूचना आणि मार्गदर्शन घेण्यास नक्की आवडेल. 😇🙏 आणि आवडल्यास कौतुक करायलाही विसरू नका 😛
#भाग १ आणि #भाग २ मध्ये आपण जोकर आणि बैटमैन मधल्या संघर्षात जोकर नेहमी कसा श्रेष्ठ ठरतो हे पाहिलं त्याच बरोबर कथानकात नोलन नियमांचं काटेकोर पणे केलेलं पालन यावर चर्चा केली भाग १ च्या तुलनेत भाग २ तुम्हाला रटाळ आणि रिपीटेड झालेल वाटलं असेल तर त्याबद्दल क्षमस्व 🙏 😊 आज आम्ही 🙏 एकंदरीत सगळ्याच बाबींवर बोट ठेऊन या ३ भांगात चाललेल्या सिरीजला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करु.
आज आपण अश्याच एका नियामाबरोबर चाहुबांजूनी एकंदरीत जोकर, बैटमैन आणि डार्क नाईट वर चर्चा करू. काही आणखीन नियम नोलान फिल्म मध्ये पळताना दिसतात त्यातला एक नियम म्हणजे “फिल्म चा नायक आणि खलनायक यांना एकाच ध्येयासाठी थेट संघर्षात येण्यासाठी भाग पाडणे. आणि पुन्हा पुन्हा हीच क्रिया अमलात आनणे.” (हे मराठीत जमेल तस केलेलं भाषांतर आहे ईतकचं) या नियमाचा उल्लेख आपण “जॉन ट्रूबी“ यांच्या स्टोरी टेलिंग वर आधारित “द एनाटोमी ऑफ स्टोरी” या पुस्तकात वाचू शकता. आता तुम्ही म्हणाल दोघांचा एकच उद्देश कसा काय असू शकतो तर आपण जर मागच्या दोन भागात यावर बरचं भाष्य केलंय त्या निष्कर्षावरून पाहिलं तर जोकर आणि बैटमैन नैतिकतेची लढाई लढत असतात इथे त्यांचा उद्देश एक होतो. एकीकडे जोकर अक्ख जग कस कुठेना कुठे तरी नैतिकतेच्या बाबतीत चुकीचं आहे हे सिद्ध करण्यात लागलेला असतो तर दुसरीकडे बैटमैन, जोकर कसा नैतिकतेच्या बाबतीत चुकीचा आहे. हे सिद्ध करण्यात लागलेला असतो. दोघांचा हेतू शेवटी एकच, फक्त दृष्टीकोन वेगळा असतो. सिनेमा रंजक🤩 होण्यामागच हे एक मोठं कारण असेलच.
Advertisement
Bestseller Book
पहिल्या लेखात डिस्कस केलेल्या नियमाचा पुन्हा विचार केलात तर तर (“नियम : Protagonist (hero/heroin) ची स्टोरी बौद्धिक तर्कांवर तेव्हा दर्शकांना भुरळ पाडू शकते आणि भावनिक दृष्ट्या दर्शकांना connect होऊ शकते जेव्हा ती Antagonist (विलन) झबरदस्त विरोधाभास असणारी परिस्थिती निर्माण करतो आणि हिरोला एका नावडत्या परिस्थितीला समोर जायला भाग पाडतो.”) याचाच दुसरा अर्थ म्हणजे विलन हा विलक्षण शक्तिशाली असला पाहिजे. विलन जितका जास्त शक्तिशाली तितकाच हिरोचा संघर्ष जास्त इथे मला 🙏 “जॉन ट्रूबी“ यांच्या “द एनाटोमी ऑफ स्टोरी” या पुस्तकाचा पुन्हा आधार घ्यावासा वाटतो ज्यातला एक नियम आहे “असा विरोधी (विलन) तयार करा जो नायकाच्या सर्वात मोठ्या दुर्बलतेवर प्रचंड विलक्षण पद्धतीने घाला घालण्यास समर्थ असतो” (मराठीत भाषांतर) जसं मी 🙏 पहिल्या लेखात म्हटलंय 👉 “जोकर स्वतः कसा निर्भीड आणि निडर आहे बैटमैनची बलाढ्य देहयष्टी कशी त्याच्यासमोर शून्य आहे हे ही दर्शवून द्यायला विसरत नाही.” म्हणजे जोकर आणि बैटमैनचा जेल मधला संवाद आणि सामना आठवा ज्यात बैटमैन जोकरला रेचल आणि हार्वी डेंटला कुठ ठेवलंय या बद्दल विचारतो… आणि पुन्हा पुन्हा विचारून सुद्धा शब्द नं काढण्यार्या जोकर वर जेव्हा बैटमैन आपल्याकडे असलेली अपार शारीरिक शक्ती ज्याने तो भल्या भल्या गुन्हेगारांना नमवतो त्याचं शक्तीचा वापर जोकरवर करतो त्यानंतरही जोकर बैटमैनने विचारलेल्या प्रश्नावर चकार शब्द देखील काढत नाही उलट जोकर त्याला जोरजोराने हसत प्रतिउत्तर देतो “You have nothing, nothing to threaten me, Nothing to do to with all your strength…” या डायलॉग ने जोकर बैटमैनच्या सर्वात मोठ्या सामर्थ्यालात्याच्या सर्वात मोठ्या दुर्बलतेत परावर्तीत करतो. जोकर अस करू शकतो कारण जोकरला मृत्यूचं भय नाही त्याच बरोबर त्याला बैटमैनच्या हातून मृत्यू स्वीकारायला हरकत नसते. जोकर सारख्या माथेफिरूला थांबवण्यासाठी त्याला जीवे मारण हा एकचं पर्याय असताना… बैटमैनच्या नैतिकतेच्या नियमांमध्ये माणसांना जीवे मारणं बसत नसल्यामुळे बैटमैन असं कधीच करणार नाही हे जोकरला अचूक माहित असतं याउलट जोकर कसा बैटमैन विना अपूर्ण आहे हे जोकर त्याच्या संवादातून वारंवार जाणवून देतो.
यापद्धतीने “क्रिस्टोफर नोलनचा” जोकर घडतो कुणीतरी पहिल्या लेखात कमेंट मध्ये म्हटल्याप्रमाणे जोकर वर जितकं लिहू तितकं कमी आहे 🤩
जाता जाता
सिनेमाला उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी, संवाद, Background Score आणि सिनेमाच्या एडिटिंग ची साथ मिळाली यात दिग्दर्शक म्हणून नोलन च श्रेय आलचं. जेलच्या सीन मध्ये नोलन सिनेमॅटोग्राफीचा नियम रुल ऑफ १८० डिगरी चा नियम मोडताना दिसतात (हे फक्त माहितीसाठी यावर वेगळा लेख होऊ शकतो) तरीही सीन कुठेही विस्कटलेला वाटत नाही. जेल सीन मध्ये वापरल्या गेलेल्या लायटिंग बद्दल पण नोलन ची जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमीच.
जोकर महाकाय, विक्षिप्त, अतिरेकी, भयावह त्याचबरोबर आपलासाही वाटतो… कारणं भरपूर आहेत त्यात जोकर साठी लिहिले गेलेले सीन जोकरचे सर्व शेड दर्शवतात. मग तो बँक मधे दरोडा टाकणारा जोकर असो किंवा दरोडा घातेलेला सर्व पैसा जाळणारा जोकर, जेल मध्ये बसून टाळ्या वाजवणारा जोकर असो वा जेल ब्रेक करून निसटणारा जोकर, नर्स च्या पोशाखात विशिष्ट शैलीत चालणारा जोकर, किंवा अंडरवर्ल्ड डॉन्स च्या मिटिंग मध्ये पेन्सील ची जादू दाखवणारा जोकर त्याच्या सगळ्या छटा प्रेक्षकांना आवडतात. त्याचे तसे बरेच डायलॉग फेमस झाले पण त्याचा आम्हाला 🙏 आवडलेला आमचा फेवरेट डायलॉग म्हणजे 👉 “If You Good At Something Never Do It For Free 🤩”
डार्क नाईट मधला जोकर🤡, बैटमैन पेक्षाही जास्त मनाला का भिडतो?
Batman Dark night Joker’s Character Explained in Marathi
Dedicated to Christopher Nolan
Batman Dark night Joker’s Character Explained in Marathi
Dedicated to Christopher Nolan
तीनही भाग आवडले असल्यास आणि अशीच एखादी सिरीज आपल्या आवडत्या सिनेमावर वाचायची उत्सुकता असल्यास कृपया कमेंट करून सांगा…
तुम्हाला आमचा ब्लॉग सिनेमासमीक्षक आवडला असल्यास ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून व तुमचे मत दर्शवा…
(सबस्क्राईब केल्यानंतर, आपल्या ईमेल आयडीवर जाऊन वेरीफाय करण्यास विसरू नका)
(सबस्क्राईब केल्यानंतर, आपल्या ईमेल आयडीवर जाऊन वेरीफाय करण्यास विसरू नका)
ट्रेलर पहा …
Video Source : Movieclips Classic Trailers Official YouTube Channel
The Dark Knight (2008) Official Trailer #1 – Christopher Nolan Movie HD
Batman Dark night Joker’s Character Explained in Marathi

Cinema Samikshak

Cinema Samikshak