डार्क नाईट मधला जोकर, बैटमैन पेक्षाही जास्त मनाला का भिडतो?

आजचा लेख क्रिस्टोफर नोलन❤️ यांच्यासाठी…


डार्क नाईट मधला जोकर🤡, बैटमैन पेक्षाही जास्त मनाला का भिडतो?
भाग१


फिल्म पाहिल्यावर कधी तुम्हाला प्रश्न पडलेत नक्कीच पडले असतील कुठलाही श्रोता या गोष्टीला अपवाद असेल अस मला तरी वाटत नाही. मला जोकर पाहताना पडलेला हा प्रश्न कि “जोकर मनाला का भिडतो?” काय कारण असाव बरं… साहजिकच आहे याच सरळ सोप्पं उत्तर म्हणजे “हित लेजर” चा उत्कृष्ट अभिनय हे नं कळण्याइतके दर्शक निरागस किंवा नादान नक्कीच नाहीत. जोकर म्हणून “हित लेजर” आपल्या जवळचा Antagonist असूनही तो जवळचा (सिनेमेटिक भाषेत वापरला जाणारा शब्द) म्हणजेच विरोधात असणार पहिलं पात्र म्हणजेच खलनायक माफ करा अवघड शब्द (सगळ्यांसाठी अवघड नसेल पण) वापरून मला इथे लिखाण किती सुंदर होऊ शकत हे दर्शवायच नाहीए या शब्दाचा उच्चार केवळ पुढचा लेख सिनेमेटिक पद्धतीने समजण्यासाठी (इन केस कुणाला माहित नसेल तर) तर “हित लेजर” म्हणजेच आपल्या जवळचा विलन… बर्याचदा सिनेमाचा “Hero” म्हणजेच Protagonist ( म्हणजे पहिलं पात्र म्हणजे मुख्य पात्र) मुळात Antagonist आणि Protagonist या दोन्ही शब्दांचा उगम ग्रीक भाषेतून झालाय… बर्याचदा सिनेमाचा “Hero” सिनेमातील कुठल्याही इतर पात्रा पेक्षा आपल्याला भावतो किंवा सहायक कलाकार भावतो आणि जर विलनचा अभिनय उत्कृष्ट असेल तर विलन ही आवडतो पण अस खूप अल्प प्रमाणात घडताना दिसतं कि सिनेमातील इतर पात्रांपेक्षा दर्शकांना विलन आवडतो. हे होणं खूप कमीच. आता एवढ्या उत्कृष्ट अभिनया नंतर हित लेजरला श्रेय का जावू नये. नक्कीच गेलचं पाहिजे.

पण…

हे जरी १००% खरं असलं आणि आहेच तरी सिनेमातल्या इतर काही जमेच्या बाबी या सिनेमाला आणि या सिनेमातील जोकर ला महान बनवतात. ज्याची दर्शक म्हणून नोंद घ्यावी अस मला आवर्जून वाटलं. हित लेजरचा अभिनय उत्कृष्ट होता यात दुमत नाहीच पण त्याच्या उत्कृष्ट अभिनयाला साथ मिळाली ती म्हणजे “क्रिस्टोफर नोलन” च्या (सिनेमाचे दिग्दर्शक आणि सहायक लेखक) उत्तुंग इच्छाशक्तीची ज्यांनी चित्रपटाचा हवा तसाचं Impact दर्शकांवर पडावा यासाठी चित्रपटाच्या कथानकावर भरपूर मेहनत घेतली आणि चित्रपटाच्या पटकथेवर हव तसचं काम त्यांनी चित्रपटाचे लेखक डेविड गोयर आणि नोलान चे भाऊ जोनाथन नोलन (सहायक लेखक) कडून काढून घेतलं आणि स्वतः ही पटकथेवर काम केलं आणि जगाला कधी नीट न कळलेलं “गोथम शहर”, “बैटमैन” आणि आपला आवडता “जोकर” दिला.

अस म्हणण्या मागचं कारण नोलान ने प्रत्यक्षात साकारलेला “डार्क नाईट”, सिनेमाच कुठूनही तांत्रिक किंवा Professional प्रशिक्षण नं घेतलेल्या नोलान चा खरतर चित्रपटांचा अभ्यास एकदम सखोल नोलान आपल्या चित्रपटांमध्ये चित्रपट बनवण्यासाठी वापरल्या जाण्यारा नियमांचा वापर विलक्षण पद्धीने करतातही आणि कधी कधी नियमावालीचा आदर ठेवत नियम मोडून त्यापलीकडे जाऊन स्वताचा नियम बनवताना दिसतात जो सिनेश्रुष्टीतल्या बड्या बड्या दिग्गजांना पण अवाक करणारा असतो.

Advertisement
https://www.amazon.in/dp/B077S5CVBQ/?ref=assoc_tag_sept19?actioncode=AINOTH066082819002X&tag=atmarampaleka-21


या सिनेमातही त्यांनी चित्रपटाच्या कथानकाने म्हणजेच पठकथेने दर्शकांना भुरळ पाडली. मग काय अशी जादू नोलान ने केली असेलं बरं कि मी हित लेजरच्या उत्कृष्ट अभिनयाला नोलानचं कथानका बरोबर आणि दिग्दर्शना बरोबर जोडतोय. तर कारण अस की चित्रपटात नोलान Screenwriting च्या नियमांच तंतोतंत पालन करताना दिसतात या नियमांचा उल्लेख आपण “रोबर्ट मकी” यांच्या “स्टोरी” या पुस्तकात पाहू शकता तो म्हणजे “नियम : Protagonist (hero/heroin) ची स्टोरी बौद्धिक तर्कांवर तेव्हा दर्शकांना भुरळ पाडू शकते आणि भावनिक दृष्ट्या दर्शकांना connect होऊ शकते जेव्हा ती Antagonist (विलन) झबरदस्त विरोधाभास असणारी परिस्थिती निर्माण करतो आणि हिरोला एका नावडत्या परिस्थितीला समोर जायला भाग पाडतो.” (हे मराठीत जमेल तस केलेलं भाषांतर आहे ईतकच). तुम्ही जर अगदी मागे जाऊन ७० च्या दशकातला आणि आजही सगळ्यांचा आवडता एवरग्रीन सिनेमा म्हणजे “शोले” आठवलात तर त्यातही नेमक हेच घडलं होतं पण त्या सिनेमात विलन वर एवढ काम केलं गेल असेल का? हा प्रश्नचं… पण अम्ब्जद खानने साकारलेला “गब्बर” सगळ्यांना भावतो… का तर साहजिक गब्बर चा अभिनय पण त्याच बरोबर गब्बर अशी काही परिस्थिती निर्माण करतो जी परिस्थिती हिरोला बुचकळ्यात टाकते संकटात टाकते आणि गब्बर हा विरू पेक्षा भव्य वाटू लागतो आणि दर्शकांना आवडतो ही.

नेमकं तसच इथे नोलान ने खलनायकाला इतका विचित्र, निडर, भयावह, मानसिक रित्या विक्षिप्त दाखवलाय की तो सहजासहजी बैटमैन च्या हाती लागत नाही किंवा सहजासहजी बैटमैन त्याला रोखू शकत नाही याउलट जोकर अशी काही परीस्थीती निर्माण करतो जिथे बैटमैनला स्वत:ला सिद्ध कराव लागतं आणि बैटमैन जोकर ने टाकलेल्या पेचात अडकून पडतो. त्या पेचातून त्याला “हार्वी डेंट” एकदा वाचवतो कारण गोथम शहराला जोकर पासून बैटमैन सुरक्षित ठेवू शकतो. पण जोकर त्याच्या पेक्षा बलाढ्य बैटमैन ला पुन्हा पुन्हा Challenge करतो. जोकर बैटमैनला वारंवार आठवून करून देतो नैतिकतेच्या आणि बैटमैनच्या बळाच्या जोरावर तो जोकर विरुध्द जिंकू शकत नाही. जोकर, बैटमैन नैतिकतेच्या स्तरावरही कसा चुकीचा आहे हे जोकरने निर्माण केलेल्या पेचातून जोकर गोथम शहराला दर्शवून देतो. जोकर बैटमैन चं मानसिक खच्चीकर करण्याची एकही संधी दवडू देत नाही… आणि जोकर स्वतः कसा निर्भीड आणि निडर आहे बैटमैनची बलाढ्य देहयष्टी कशी त्याच्यासमोर शून्य आहे हे ही दर्शवून द्यायला विसरत नाही. एखद्या हिरोचा चढ उतार जेव्हा तुम्ही पडद्यावर पाहता तेव्हा तुम्ही त्याच्याशी भावनिक दृष्ट्या कनेक्ट होता आणि हिरो विलनच्या कचाट्यातून कसा निघेल यासाठी उत्सुक होता नेमकं हेच नोलान ने या चित्रपटाच्या कथानकातून, दिग्दर्शनातून आणि छायांकनातून दर्शविले आहे सिनेमाच एडिटिंग सुद्धा याला अपवाद नाही.


या सर्व कारणांनी जोकर 🤡 💪सरस होतो आणि मनाला भिडतो.

 

डार्क नाईट मधला जोकर🤡, बैटमैन पेक्षाही जास्त मनाला का भिडतो?
Batman Dark night Joker’s Character Explained in Marathi
Dedciated to Christopher Nolan 

भाग १ आवडल्यास आणि २ वाचायची उत्सुकता असल्यास कृपया कमेंट करून सांगा…

तुम्हाला आमचा ब्लॉग सिनेमासमीक्षक आवडला असल्यास ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून व तुमचे मत दर्शवा…
  (
सबस्क्राईब केल्यानंतर, आपल्या ईमेल आयडीवर जाऊन वेरीफाय करण्यास विसरू नका)

   व्हिडिओ पहा …
Video Source : MrFreezy Official Youtube Channel
 

Joker Interrogation Scene – The Dark Knight [4K Ultra HD]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *